ताज्या घडामोडी महागाव तालुक्यात शिक्षक वर्ग गुंतला ठेकेदारी आणि एल आय सी बिझनेसमध्ये शिक्षणाची वाट चुकले मास्तर ,आता विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या भरोशावर ? ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव उघड पडले आहे. ज्ञानदानाची पवित्र जबाबदारी सांभाळणारा शिक्षक वर्गच आता ठेकेदारी, कमिशनखोरी आणि एल आय सी बिझनेस यामध्ये गुंतला असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा फज्जा उडाल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शिक्षकांच्या खांद्यावर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आहे, तेच शिक्षक आता साईड बिझनेसचे एजंट म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. वर्गाच्या वेळेत येथील एक शिक्षक आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या एलआयसी पॉलिसी विक्री करत आहे.त्यांनी महागाव तालुक्यात मोठे प्रस्थ निर्माण केले असून ते अनेकदा वादग्रस्त सुद्धा ठरले आहेत. वास्तव धक्कादायक आरोप ठोस ! काही शिक्षकांकडे एल आय सीचे टार्गेट पूर्ण करणे हेच प्राथमिक ध्येय, विद्यार्थ्यांचे शिक्षण दुय्यम ठेकेदारीमुळे शाळेमध्ये उपस्थिती कमी, गावोगावी व्यवहार, मोजमाप, बिलं हीच दिनचर्या पालकांकडून पॉलिसी घेण्याचा अप्रत्यक्ष दबाव, न घेतल्यास मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी शाळेच्या वेळेतच बिझनेस कॉल, बिझनेस मीटिंग अध्यापनावर झापड वर्गात जुनी वही, जुने लेक्चर, विद्यार्थ्यांना नो गाईडन्स शाळांमध्ये परीक्षेचा दर्जा, निकाल, प्रगती संपूर्ण घसरण होतांना सातत्याने दिसून येते. ———————————————————————- प्रशासन फक्त आदेश काढते अंमलबजावणी मात्र शून्य ! शिक्षकांना व्यवसायावर निर्बंध असावेत, साईड बिझनेस बंद असावा, शाळेच्या वेळेत दुसरे काम करू नये असे आदेश शिक्षण विभागाकडून अनेकदा निघाले. परंतु महागाव तालुक्यात त्यांची अंमलबजावणी झालीच नाही.माणूसबळ कमी, शाळांमध्ये तुटवडा आणि जे आहेत तेच कमाईच्या मागे पळताना दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारमय होत चालले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवायचे असेल तर शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने ह्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.नाहीतर आज ठेकेदारीच्या आणि एलआयसीच्या जाळ्यात अडकलेले शिक्षक उद्या संपूर्ण पिढीचे शैक्षणिक भविष्य अंधारात लोटतील असा पालक वर्गातून आरोप होत आहे. ________________________________________________ शिक्षकांचे व्यवसाय पाहणार कोण? शिक्षणाचा बळी का ? स्थानिक नागरिक, पालक वर्ग संतप्त कठोर कारवाईच एकमेव पर्याय ! दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची मागणी,स्वतंत्र पथकाने चौकशी करून अहवाल जाहीर करावा, कोणते शिक्षक कोणत्या बिझनेसमध्ये गुंतले आहेत ते पारदर्शकपणे उघड करावे, शाळांमध्ये अचानक ऑडिट व निरीक्षण मोहीम सुरू करावी विद्यार्थ्यांचे नुकसान झालेल्या शाळांत विशेष अध्यापन मोहीम राबवावी अशी जनभावना आहे. 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव
ताज्या घडामोडी महागाव तालुक्यात शिक्षक वर्ग गुंतला ठेकेदारी आणि एल आय सी बिझनेसमध्ये शिक्षणाची वाट चुकले मास्तर ,आता विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या भरोशावर ? ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव उघड पडले आहे. ज्ञानदानाची पवित्र जबाबदारी सांभाळणारा शिक्षक वर्गच आता ठेकेदारी, कमिशनखोरी आणि एल आय सी बिझनेस यामध्ये गुंतला असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा फज्जा उडाल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शिक्षकांच्या खांद्यावर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आहे, तेच शिक्षक आता साईड बिझनेसचे एजंट म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. वर्गाच्या वेळेत येथील एक शिक्षक आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या एलआयसी पॉलिसी विक्री करत आहे.त्यांनी महागाव तालुक्यात मोठे प्रस्थ निर्माण केले असून ते अनेकदा वादग्रस्त सुद्धा ठरले आहेत. वास्तव धक्कादायक आरोप ठोस ! काही शिक्षकांकडे एल आय सीचे टार्गेट पूर्ण करणे हेच प्राथमिक ध्येय, विद्यार्थ्यांचे शिक्षण दुय्यम ठेकेदारीमुळे शाळेमध्ये उपस्थिती कमी, गावोगावी व्यवहार, मोजमाप, बिलं हीच दिनचर्या पालकांकडून पॉलिसी घेण्याचा अप्रत्यक्ष दबाव, न घेतल्यास मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी शाळेच्या वेळेतच बिझनेस कॉल, बिझनेस मीटिंग अध्यापनावर झापड वर्गात जुनी वही, जुने लेक्चर, विद्यार्थ्यांना नो गाईडन्स शाळांमध्ये परीक्षेचा दर्जा, निकाल, प्रगती संपूर्ण घसरण होतांना सातत्याने दिसून येते. बॉक्स: प्रशासन फक्त आदेश काढते अंमलबजावणी मात्र शून्य ! शिक्षकांना व्यवसायावर निर्बंध असावेत, साईड बिझनेस बंद असावा, शाळेच्या वेळेत दुसरे काम करू नये असे आदेश शिक्षण विभागाकडून अनेकदा निघाले. परंतु महागाव तालुक्यात त्यांची अंमलबजावणी झालीच नाही.माणूसबळ कमी, शाळांमध्ये तुटवडा आणि जे आहेत तेच कमाईच्या मागे पळताना दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारमय होत चालले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवायचे असेल तर शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने ह्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.नाहीतर आज ठेकेदारीच्या आणि एलआयसीच्या जाळ्यात अडकलेले शिक्षक उद्या संपूर्ण पिढीचे शैक्षणिक भविष्य अंधारात लोटतील असा पालक वर्गातून आरोप होत आहे. बॉक्स: शिक्षकांचे व्यवसाय पाहणार कोण? शिक्षणाचा बळी का ? स्थानिक नागरिक, पालक वर्ग संतप्त कठोर कारवाईच एकमेव पर्याय ! दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची मागणी,स्वतंत्र पथकाने चौकशी करून अहवाल जाहीर करावा, कोणते शिक्षक कोणत्या बिझनेसमध्ये गुंतले आहेत ते पारदर्शकपणे उघड करावे, शाळांमध्ये अचानक ऑडिट व निरीक्षण मोहीम सुरू करावी विद्यार्थ्यांचे नुकसान झालेल्या शाळांत विशेष अध्यापन मोहीम राबवावी अशी जनभावना आहे. 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि
ताज्या घडामोडी शेतकरी पुत्र झाला एम. बी. बी. एस. , एम. डी. मेडिसिन . 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे : उमरखेड नगरीचे भूमिपुत्र डॉ. विठ्ठलराव चौधरी यांचे
ताज्या घडामोडी घांटजी (जि. यवतमाळ) येथील जिव्हाळ्याची भिंत संस्थेला भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचा मायेचा हात एका महिन्याच्या किराणा साहित्याचे जिव्हाळ्याने वितरण 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क घांटजी ( जि. यवतमाळ) : सेवेला धर्म मानणाऱ्या आणि समाजातील प्रत्येक
ताज्या घडामोडी संकटात पुन्हा धावून आले नितीनभाऊ भूतडा सहस्रकुंड येथे अडकलेल्या ७ पर्यटकांचा यशस्वी बचाव 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क उमरखेड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ सहस्रकुंड धबधबा येथे आज भीषण
Uncategorized ताज्या घडामोडी फुलसावंगी बाजारपेठ बनली रेती उपसा करणारा अड्डा.. थेट जेसीबी मशीन ने रात्रंदिवस वाळू उपसा सुरू ! 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे वाळू माफियांच्या तस्करीला महसूल विभागाची मुक संमती ? लोकवेध न्युज नेटवर्क ⚫ ज्ञानेश्वर ठाकरे
ताज्या घडामोडी देशविदेश/राष्ट्रीय राज्य/महाराष्ट्र विदर्भ नगरपरिषद निवडणूक शांतता पुर्वक काटेकोरपणे पार पाडा ! – निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ▪ पत्रकार परिषद संपन्न ⚫ ज्ञानेश्वर ठाकरे उमरखेड – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी ।साठी नामांकन प्रक्रिया
ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्युज राजकीय उमरखेडच्या भूमिपुत्र डॉक्टरांकडून आरोग्यवर्धक उपक्रम – डॉ. अंकुश देवसरकर यांचा ‘गुळ पावडर’ उद्योग सुरु ! 12 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⬛ उत्पादित गुळ पावडरची देशासह विदेशात मागणी ⚫ ज्ञानेश्वर ठाकरे “आरोग्यसेवा आणि उद्योजकता
ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्युज राज्य/महाराष्ट्र पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती! 1 year ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष कामासाठी विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांची पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी
ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्युज राजकीय राज्य/महाराष्ट्र राज्यमंत्री भरणेंची तत्परता; स्वतःची गाडी रुग्णाला देऊन गेले टूव्हीलर वर घरी! 1 year ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे इंदापुर | वेळ सायंकाळी 7ची इंदापूर तालुक्यातील जंक्शनजवळ बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या