तपासाच्या आधारे क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा; ठाणेदार सेवानंद वानखडे आणि त्यांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी! वीस जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवून आरोपी निष्पन्न; महागाव पोलिसांच्या तपासाला यश

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २७ ऑक्टोबर. 

 

महागाव :

 

एका महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान महागाव पोलिसांसमोर असताना,ठाणेदार सेवानंद वानखडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कसून तपास करत अखेर आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.

 

क्लिष्ट आणि आव्हानात्मक तपासाद्वारे गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल ठाणेदार वानखडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर प्रकरणात आरोपी अज्ञात असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते.या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी विविध अंगांनी तपास केला. 

 

तपासादरम्यान तब्बल वीस व्यक्तींचे रक्तनमुने डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आले. वैज्ञानिक पुरावे आणि तपासातील बारकावे यांच्या आधारे आरोपी निष्पन्न करण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली.अखेर या अथक प्रयत्नांना यश आले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.

 

गुन्ह्याच्या तपासात वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर, संयम, चिकाटी आणि पथकातील समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही तपासाची दिशा कायम ठेवत गुन्ह्याचा उलगडा करण्याची कामगिरी महागाव पोलिसांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या