उमरखेडमध्ये आज कोजागिरी पौर्णिमेचा दुग्धशर्करायुक्त सोहळा; महायुतीच्या नवनिर्वाचित सहकार क्षेत्रातील संचालकांचा भव्य सत्कार, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा
उमरखेडमध्ये आज कोजागिरी पौर्णिमेचा दुग्धशर्करायुक्त सोहळा; महायुतीच्या नवनिर्वाचित सहकार क्षेत्रातील संचालकांचा भव्य सत्कार, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज, बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धशर्करायुक्त कोजागिरी सोहळा आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने नवनिर्वाचित झालेल्या सर्व संचालकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील नवनिर्वाचित नेतृत्वाचा गौरव करण्यासोबतच सामाजिक सलोखा आणि राजकीय सौहार्दाचा संदेश दिला जाणार आहे.
उमरखेड येथील महागाव रोडवरील स्व.गो. सो. सारडा राजस्थानी भवन येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवी वातावरणात आयोजित या सोहळ्याकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमाला राज्यसभेचे सदस्य खासदार रामरावजी वडकुते, विधान परिषद सदस्य आमदार श्रीमती प्रज्ञाताई राजे सातव, आमदार श्यामसुंदर चतुर्वेदी आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक नितीनभाऊ भुतडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने निवडून आलेल्या सर्व संचालकांचा यावेळी सहृदय सत्कार करण्यात येणार आहे.सहकार क्षेत्रातील या नवनिर्वाचित नेतृत्वाचा सन्मान करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देणे,हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यात दुग्धशर्करायुक्त कोजागिरीचा आस्वाद घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महायुतीच्या वतीने निमंत्रण
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई महायुती, उमरखेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सहकार क्षेत्रातील नवनिर्वाचित संचालकांचा गौरव आणि कोजागिरीचा आनंद अशा दुहेरी पर्वणीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.