मोफत नेत्र तपासणी शिबिराचे मुडाण्यात आयोजन स्वर्गीय गजानन सुरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम;  अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २९ सप्टेंबर 

 

महागाव :- 

 

शिवाजी नगर, नांदेड संचलित माने नेत्रालय व दृष्टि फाउंडेशन यांच्या वतीने माने नेत्रालय उमरखेड येथील तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत स्वर्गीय गजानन सुरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुडाणा येथील जय ज्ञानान क्लिनिक,जगदंबा मेडिकलच्या बाजूला, वडद रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

शिबिरामध्ये नागरिकांची संपूर्ण नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान व उपचार, चष्म्याचा नंबर तपासणी तसेच अल्पदृष्टी असलेल्या नागरिकांसाठी चष्म्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे.

विशेष म्हणजे,तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळून आल्यास अल्पदरात ऑपरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

 

ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी व उपचार मिळावेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे मुडाणा व परिसरातील नागरिकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिबिरासाठी संपर्क : ७४१०१०४७६७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या