लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांसाठी काँग्रेसचा जनता दरबार लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांसाठी काँग्रेसचा जनता दरबार; महागावात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांसाठी काँग्रेसचा जनता दरबार लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांसाठी काँग्रेसचा जनता दरबार; महागावात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाव येथील तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी, नीलिमा काळे ताई, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी कावळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील भाऊ राठोड, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण, माजी नगराध्यक्ष सुनंदाताई कोपरकर, नगरसेविका सुरेखाताई कोपरकर, नगरसेविका रूपालीताई कोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या महिलांनी या जनता दरबारात आपल्या अडचणी मांडल्या. अर्ज, पात्रता, कागदपत्रे तसेच योजनेच्या लाभाशी संबंधित विविध समस्या जाणून घेण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. महिलांच्या प्रश्नांना व्यासपीठावरून मार्गदर्शन करण्यात आले तसेच संबंधित अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला काँग्रेस कमिटीच्या महागाव तालुकाध्यक्ष सौ. जयश्री संजय नरवाडे, महिला काँग्रेस कमिटीच्या महागाव शहराध्यक्ष सौ. सीमा नरवाडे, हसीना आगवान, दीक्षा धम्मानंद कावळे, सीमाताई जाधव, प्रसिक पाईकराव यांच्यासह काँग्रेसच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान पाटील राऊत यांनी केले. तालुक्यातील महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकून घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबाराला महिलांचा मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला.