नगरपरिषद निवडणूक शांतता पुर्वक काटेकोरपणे पार पाडा ! – निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे

img

▪ पत्रकार परिषद संपन्न
⚫ ज्ञानेश्वर ठाकरे

उमरखेड –
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी ।साठी नामांकन प्रक्रिया १० नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी सर्व निरंक नामांकन प्राप्त झाले आहेत उमरखेड शहरातील एकूण मतदार संख्या ४० हजार ६७० असून त्यामध्ये पुरुष मतदार २० हजार ५६० आणि महिला मतदार २० हजार ११० आहेत . निवडणुकीसाठी मतदान केंद्रे ठरवण्यात आली आहेत उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रत सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्र स्विकारण्यासाठी प्रभाग निहाय ६ पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी माहिती आयोजित न प कार्यालय पत्रकार परिषद मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली
शांतता पूर्वक व काटेकोर पणे या निवडणुकी मध्ये पालन करने अंत्यत महत्वाचे आहे असे मुळे पुढे म्हणाले , मतदारांना प्रमाणपत्रे, सुविधा आणि मार्गदर्शन देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जात आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी साहित्य वितरणाची व्यवस्था नगरपरिषद उमरखेड मंगल कार्यालयाच्या तळमजल्यावर करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली आहे. यामध्ये २ भरारी पथक, १ व्हिडिओ पाहणी पथक आणि इतर पथकांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७ : ३० ते सायंकाळी ५ : ३० दरम्यान मतमोजणी होईल या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजय कुरवाडे गट विकास अधिकारी किरण कोळपे , रोहित शिंदे अधिकारी उपस्थित होते

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या