ग्लॅमर फॅशन आयकॉन ऑफ इंडिया सौंदर्य स्पर्धा तब्बल पाचव्यांदा यशस्वीरित्या संपन्न हि सौंदर्य स्पर्धा पुण्यातील आचार्य अत्रे रंग मंदीर येथे थाटात संपन्न

लोकवेध न्यूज नेटवर्क

 

ग्लॅमर फॅशन आयकॉन” या भव्य सौंदर्य स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला. किड्स, टीन, मिस, मिसेस आणि मिस्टर या सर्व कॅटेगरीजमधील विजेत्यांना ट्रॉफी, क्राऊन, सर्टिफिकेट, सॅश आणि आकर्षक गिफ्ट्स देण्यात आले. स्पर्धकांसाठी खास फोटोशूट, स्टायलिश आऊटफिट्स, मेकअप, हेअरस्टाईल व प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.

 

प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंचावर आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक, ट्रेनर्स, कोरिओग्राफर्स व संपूर्ण टीमने मोठे योगदान दिले.

या भव्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, शिमोनील वांकडिया,विकी शिंदे, कबिता शर्मा, रेणु पंजाबी, सागर सकट, प्रविण सावंत, सुभाष चव्हाण, वैशाली काळे यांच्या हस्ते पार पडले. शो चे दिग्दर्शन ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.कविता पवार आणि मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनिषजी मुथ्था हे होते

 

सुंदर अशी गणेश वंदना सादर केली ज्यांचे प्रशिक्षण विजय सर यांनी दिले होते.

 

कार्यक्रमात मुलं, किशोर, मिस, मिसेस, मिस्टर आणि रनवे मॉडेल अशा विविध गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

 

त्यापैकी विजेते ठरले हेत्वीक, नुर्वी पाटील,

हिदाया, अवांत खडसे, तितिक्षा प्रसाद, उपासना पाटील, ओमकार, रेवा दिघे, काव्या कदम, सिया

 

मिस्स विनर कॅटेगिरी मध्ये स्नेहा सुरवाडे, सिमरन, विनीता शर्मा,

 

मिसेस विनर कॅटेगीरीमध्ये मिनल राऊत, सोनाली अहिरे, प्रियंका बनसोडे,

 

मिस्टर कॅटेगिरी मध्ये शंकर कामठे, दिव्यम ओझा, गणेश नाईक हे विजेते ठरले

 

 

 

विशेष सन्मान

 

• स्लिक्स ब्रँड ॲम्बेसेडर प्रगन्या पाटील

नृत्य दिग्दर्शन – शुभम दिवेकर

पोशाख भागीदार –अपुर्वा यादव

• फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी–सॅन्डी बांगर

• निलेश शेवाळे

• रोहित थोरात

• कृष्ण डवरे

 

मीडिया पार्टनर्स

• मराठी 9 न्युज (शिवानंद राठोड, सचिन उबाळे)

ज्युरी पॅनेल

• आंतरराष्ट्रीय मॉडेल – शेमोनील वांकाडिया

• विकी शिंदे

• कबिता शर्मा

• रेणु पंजाबी

या कार्यक्रमात सुजाता काळे आणि त्यांच्या टीम यांनी मेक अप पार्टनर म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.

सूत्रसंचालन

• भारतातील सर्वात मोठा रॅपर – AVG (अभिनंदन गायकवाड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या