नीट २०२६ निकालात आयआयबीची ऐतिहासिक भरारी; अवघड पेपरमध्येही ६० हून अधिक विद्यार्थ्यांना ६००+ गुण

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २१ जुलै.

 

नांदेड:- 

 

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-2026) च्या निकालात आयआयबी संस्थेने पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. यंदाच्या अवघड प्रश्नपत्रिकेतही आयआयबीच्या तब्बल ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर २१ जून रोजी पुनर्परीक्षा (Re-NEET) घेण्यात आली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार यश मिळवत संस्थेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

यंदाच्या निकालात सार्थक धनराज सूर्यवंशी याने ६७५ गुण मिळवत संस्थेत अव्वल स्थान पटकावले. त्याचप्रमाणे विशाल कोंडिबा भिसे (६६२), अर्जुन गणेश देशमुख (६५६), विकास विनोदकुमार कोंडा (६५४), गणेश मल्लिकार्जुन ब्याळे (६५२), शिवम सूर्यकांत येवतीकर (६५१), महेश माधव बोलपिलवाड (६४९), यशराज राजेंद्र पाटील (६४३) आणि हर्षवर्धन विकास सवंडकर (६४१) यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत यशाची परंपरा पुढे नेली. याशिवाय ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त गुण मिळवून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी मजबूत दावेदारी निर्माण केली आहे.

देशातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.यंदा एम्ससह विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास आयआयबी व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. दोन वर्षांच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांचा अभ्यास, मानसिक ताण, नियमित सराव, समुपदेशन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचे संस्थेने सांगितले. या निकालामुळे विद्यार्थी आणि पालकांचा आयआयबीवरील विश्वास आणखी दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

गुणवत्तेचा भक्कम वारसा

आयआयबीने आतापर्यंत नीट परीक्षेत अनेक विक्रम प्रस्थापित केले असून २० हजारांहून अधिक एमबीबीएस डॉक्टर घडवणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अनुभवी शिक्षकवर्ग, अद्ययावत कॅम्पस, संशोधनाधारित स्टडी मटेरियल, बोर्ड व नीटची एकत्रित तयारी, नियमित समुपदेशन आणि पालकांशी सातत्यपूर्ण संवाद या वैशिष्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचा आयआयबीकडे वाढता कल दिसून येत आहे.

“विद्यार्थी आणि पालकांचा अढळ विश्वास तसेच टीम आयआयबीची अथक मेहनत हीच आमच्या यशामागील खरी ताकद आहे. हा निकाल केवळ आकड्यांचा नाही, तर विश्वास, समर्पण, सातत्य आणि गुणवत्तेच्या प्रवासाचा ठोस पुरावा आहे,” असे आयआयबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या