बुद्धिबळाच्या पटावर प्रियदर्शनी कॉन्व्हेंटची विजयी चाल; अक्षित व ज्योतीरअदित्य यांची जिल्हास्तरावर झेप !

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ सप्टेंबर.

 

महागाव:- 

 

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूल, आमणीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.अक्षित राहुल पवार आणि ज्योतीरअदित्य अमोल पवार यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे.

 

स्पर्धेदरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांनी एकाग्रता,संयम,बुद्धिमत्ता आणि अचूक डावपेचांचा प्रभावी वापर करत प्रतिस्पर्ध्यांना मात दिली.बुद्धिबळाच्या प्रत्येक डावात त्यांनी दाखविलेली चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळे त्यांचे कौशल्य अधोरेखित झाले. त्यांच्या या यशामुळे प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाची भर पडली आहे.

 

अक्षित राहुल पवार व ज्योतीरअदित्य अमोल पवार यांच्या यशाबद्दल शाळेच्या सचिव वनमालाताई राठोड, मुख्याध्यापक अभिषेक सुनील राठोड, क्रीडा शिक्षक मारुती बाभळे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे,यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या यशामुळे प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूलमधील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या