महागावच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ ! काँग्रेसमधील बड्या नेत्यासह अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या तयारीत ?

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / १६ सप्टेंबर.

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमधील एका बड्या नेत्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.

 

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.संबंधित नेत्यासोबत काँग्रेसमधील काही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

या संभाव्य पक्षप्रवेशामुळे महागाव तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, कोणते नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गोटात जाणार,याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.मात्र,या प्रवेशाबाबत अद्याप संबंधित नेत्यांकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत या चर्चेकडे राजकीय घडामोड म्हणूनच पाहिले जात आहे.

दरम्यान,आगामी काळात होणाऱ्या या संभाव्य पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा कधी होते आणि काँग्रेसमधील नेमके कोणते चेहरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात,याकडे महागाव तालुक्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या