यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नितीन भुतडा यांची जोरदार तयारी भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या पाठिंब्यासह १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

लोकवेध न्यूज नेटवर्क / ३१ मे.

 

यवतमाळ :- 

 

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी निवडणूक मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या पाठिंब्यासह ते १ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील विविध नगरपरिषद, नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजप समर्थक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नितीन भुतडा यांनी गेल्या काही वर्षांत पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तसेच विविध सामाजिक आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम केले असल्याने त्यांना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा मिळेल अशी आशा आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यकर्त्यांच्या चर्चा आणि निवडणुकीच्या रणनीतीवर अंतिम तयारी करण्यात येत आहे.भाजपकडून या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात असून,पक्षाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी एकदिलाने नितीन भुतडा यांच्या पाठीशी उभे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता असून, यामुळे यवतमाळच्या राजकीय वातावरणात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी ही उमेदवारी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या