आधुनिक टेक्नॉलॉजीच्या काळात वृत्तपत्र पत्रपेटी कालबाह्य

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
डिजिटल क्रांतीच्या युगात वृत्तपत्रांच्या पारंपरिक पत्रपेट्या आता कालबाह्य ठरत चालल्या आहेत. मोबाईल इंटरनेट, ई-पेपर, सोशल मीडिया आणि न्यूज अॅप्सच्या माध्यमातून क्षणाक्षणाला अपडेट मिळू लागल्याने नागरिकांचा ओढा डिजिटल माध्यमांकडे वाढला आहे.
पूर्वी घराघरांत पत्रपेट्यांमध्ये वाचनाची उत्सुकता दाटलेली असायची. सकाळच्या बातम्या, पुरवण्या आणि जाहिरातींसाठी पत्रपेट्या महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. मात्र आता बहुतेक ठिकाणी पत्रपेट्या रिकाम्याच राहू लागल्या आहेत. अनेक भागात या पत्रपेट्या निष्क्रिय अवस्थेत दिसत असून त्यांचे उपयोग फक्त औपचारिकतेपुरते राहिले आहेत.पोस्ट विभागाच्या माहितीनुसार, मागील काही वर्षांत वृत्तपत्र वितरणात घट झाली असून नागरिकांचा डिजिटल स्वरूपातील वृत्तसेवेवर विश्वास अधिक वाढला आहे. विशेषतः तरुण पिढी मोबाईलवरच बातम्या वाचण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
