अकोला शहर जिल्हा प्रभारीपदी नितीन भाऊ भुतडा यांची नियुक्ती; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ एप्रिल
उमरखेड :-
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने यवतमाळ–पुसद जिल्हा समन्वयक तथा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले मा. श्री. नितीन भाऊ भुतडा यांची अकोला शहर जिल्हा प्रभारी या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नितीन भाऊ भुतडा यांनी यापूर्वी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत पक्ष बळकट करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्यातील कौशल्य विकास नेतृत्वगुणांमुळे व संघटन कौशल्यामुळे त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अकोला शहरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
