पूर्वोत्तर विजयाचा जल्लोष काळीत! भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
पश्चिम बंगाल,पांडेचेरी आणि आसाम येथील निवडणूक विजयाच्या पार्श्वभूमीवर काळी दौलत खान येथे भारतीय जनता पार्टी काळी मंडळाच्या वतीने जल्लोषपूर्ण उत्सव साजरा करण्यात आला.
या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी भाजपचे पुसद जिल्हा सरचिटणीस सुनील टेमकर व सक्रीय कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला.देशभरात भाजपच्या धोरणांना जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे,अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमादरम्यान प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विजयाचे श्रेय पक्षाच्या नेतृत्वाला व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिले.तसेच आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.या जल्लोषात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
