मातोश्री विद्यालयाचा बारावीमध्ये दमदार निकाल; विज्ञान १०० टक्के, कला ९८ टक्के

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०५ एप्रिल
महागाव :
येथील स्थानिक मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या बारावी (एच.एस.सी.) परीक्षेत पुन्हा एकदा उत्कृष्ट निकाल लावून आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला, तर कला शाखेचा निकाल ९८.१४ टक्के लागला. इंग्रजी माध्यम विज्ञान शाखेनेही ९९.१६ टक्के निकाल देत चांगली कामगिरी केली.
या वर्षी विज्ञान आणि कला शाखेतून एकूण २८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १०१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले, तर १३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेत कु. सानिका अविनाश राठोड हिने ९२.६७.टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. कु. समृद्धी किशोर ठाकरे हिने ९२.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. पल्लवी बालाजी केंद्रे हिने ८७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
कला शाखेत कु. संचित गजानन बसवते हिने ७६.६७ टक्के गुणांसह प्रथम स्थान मिळवले. कु. श्रद्धा संजू अढागळे हिने ७५.६७ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. किरण विनोद राठोड हिने ७४.३३ टक्के गुणांसह तृतीय स्थान मिळवले.
इंग्रजी माध्यम विज्ञान शाखेत शिवांग विकास मुलंगे हा ८९.०० टक्के गुणांसह प्रथम आला. कु. अदिती परमेश्वर बिरादार हिने ८८.८३ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. वैदेही सुधीर भांगे हिने ८८.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थापक डी. पी. जगताप यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
