९६% निकालाची दमदार परंपरा कायम; पुरोहित महाविद्यालयाचा बारावीत झळाळता यशोशिखर
लोकवेध न्यूज नेटवर्क / ०५ एप्रिल महागाव :-
येथील स्थानिक स्व. मोहनलाल पुरोहित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ९६.०३ टक्के असा भरीव निकाल नोंदवला आहे. सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि शिस्तीच्या बळावर महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक ताकद सिद्ध केली आहे.
विज्ञान शाखेने ९८.५७ टक्के निकालासह आघाडी घेतली असून कला शाखेने ९०.३२ टक्के निकालासह उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेत तुषार पवार (८७.१७%) प्रथम, श्रेयस मुटकुळे (८१.००%) द्वितीय आणि सुमेध जाधव (७९.३३%) तृतीय ठरले. कला शाखेत मंगल राठोड (६७.१७%) प्रथम, सोनाली जाधव (६५.१७%) द्वितीय, तर सत्यमेय चव्हाण (६२.८३%) तृतीय क्रमांकावर राहिले.
संस्थेचे अध्यक्ष रितेशभाऊ पुरोहित व प्राचार्य दिपक संगेवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत हे यश परिश्रम, जिद्द आणि शिक्षकांच्या प्रभावी मार्गदर्शनाचे फलित असल्याचे नमूद केले.
महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे तालुकाभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
