माळकिनी येथे सव्वा लाख शिवलिंग निर्मितीचा भव्य सोहळा सव्वा लाख शिवलिंग निर्मिती अन् रुद्राभिषेकाने परिसर दुमदुमला

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ सप्टेंबर.

 

महागाव :-

 

महागाव, जि. यवतमाळ : माळकिनी येथील दत्त मंदिर परिसरात रविवार, ६ सप्टेंबर रोजी सद्गुरु शिवलिंग व्यंकट स्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून सव्वा लाख शिवलिंग निर्मिती, रुद्राभिषेक, विधिवत पूजाअर्चना आणि महाप्रसादाचा भव्य धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

 

सव्वा लाख शिवलिंग निर्मितीच्या या पवित्र उपक्रमात असंख्य महिला भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिलांच्या मोठ्या सहभागामुळे दत्त मंदिर परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शिवनामाचा जयघोष, पूजाअर्चना आणि रुद्राभिषेकामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला.

 

महागाव येथील महिला भाविकांनाही या धार्मिक सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी सौ. जयश्री संजय नरवाडे, नगरसेविका, नगरपंचायत महागाव तथा तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी, महागाव यांच्या पुढाकारातून माळकिनी येथे जाण्या-येण्यासाठी पाच मोफत ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली होती.या सुविधेमुळे महागाव परिसरातील अनेक महिला भाविकांना या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली.

 

सद्गुरु शिवलिंग व्यंकट स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात भाविकांनी श्रद्धा व भक्तिभावाने सहभाग घेतला.शिवलिंग निर्मितीपासून रुद्राभिषेक व पूजाअर्चनेपर्यंतच्या विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होत भाविकांनी आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.दरम्यान सोहळ्याच्या समारोपानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सव्वा लाख शिवलिंग निर्मिती आणि रुद्राभिषेकाच्या या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे माळकिनी परिसरात दिवसभर भक्ती आणि श्रद्धेची अनोखी अनुभूती पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या