गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., नांदेडच्या महागाव शाखेतील कनिष्ठ अधिकारी रामेश्वर दादाराव शिंदे यांनी संस्थेतील सेवेला आठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या. या निमित्ताने त्यांना संस्थेकडून विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
आठ वर्षांच्या सेवापूर्तीबद्दल बोलताना
शिंदे म्हणाले की, गोदावरी अर्बन परिवारात काम करताना माझ्या आयुष्यातील आठ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण झाला आहे. या प्रवासात लाभलेले प्रेम,विश्वास, सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच आज समाजात माझी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.या संस्थेने मला केवळ रोजगाराची संधी दिली नाही, तर आत्मविश्वास,जबाबदारीची जाणीव आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचे बळ दिले.
त्यांनी पुढे सांगितले की, गोदावरी अर्बन ही त्यांच्यासाठी केवळ आर्थिक संस्था नसून विश्वास, संस्कार आणि आपुलकीचे कुटुंब आहे. याच नात्याच्या बळावर भविष्यातही अधिक जबाबदारीने आणि समर्पित भावनेने कार्य करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला.
या संपूर्ण प्रवासात संस्थापक तथा नामदार आमदार हेमंतभाऊ पाटील, अध्यक्षा सौ.राजश्रीताई पाटील, उपाध्यक्षा सौ. देसले मॅडम, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,डीजीएम सौ. सुरेखा दवे, एजीएम श्री. रवी इंगळे, एजीएम शिरमेवार, सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी तसेच संस्थेचे ग्राहक व सभासद यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
दरम्यान, संस्थेकडून प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रात शिंदे यांच्या समर्पण, जिद्द, सकारात्मकता आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्यात आला. नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी, शिकण्याची वृत्ती आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा यामुळे ते संस्थेचे भक्कम आधारस्तंभ ठरल्याचे गौरवोद्गार सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहेत.
रमेश्वर शिंदे यांच्या आठ वर्षांच्या यशस्वी सेवापूर्तीबद्दल सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.