एक झाड भविष्यासाठी… पर्यावरण दिनी विद्यार्थ्यांचा हरित संकल्प” कल्पतरू विशेष शाळेत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

लोकवेध न्यूज नेटवर्क /०५ जून.

 

बूटीबोरी प्रतिनिधी :

 

संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बूटीबोरी येथे ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त विद्यार्थी,शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे मानवी जीवनातील योगदान तसेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावेळी पाणी बचत,स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर आणि वृक्षसंवर्धन याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अधिकाधिक झाडे लावण्याचा व पर्यावरण जपण्याचा संकल्प केला.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज लावलेले झाड उद्याचे जीवन वाचवते. हा,संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या