गणितात शंभरी; नर्मदा सरकाटेची एसएससीत दैदिप्यमान कामगिरी

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / १२ मे.

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील आंबोडा येथील रहिवासी तथा सकाळ वृत्तपत्राचे ग्रामीण प्रतिनिधी जगदीश सरकाटे यांची कन्या कु. नर्मदा लक्ष्मीकांत सरकाटे हिने इयत्ता दहावीच्या एसएससी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, महागाव येथील विद्यार्थिनी असलेल्या नर्मदाने ९४.४० टक्के गुण मिळवत गणित विषयात तब्बल १०० पैकी १०० गुण प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे कोणत्याही ट्युशन किंवा कोचिंग क्लासेसचा आधार न घेता स्वअध्ययन, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तिने हे यश मिळविले आहे.

नर्मदाच्या या यशाबद्दल महागाव तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.नर्मदाच्या या यशामुळे आंबोडा परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या