ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा हात; श्री सेवा फर्निचरकडून पेपर पॅडचे वाटप

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ एप्रिल 

 महागाव :- 

 

 तालुक्यातील काळी (दौ.) येथील श्री सेवा फर्निचर तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे संचालक निकेश दत्तराव जाधव (रा. सातघरी, नाईकनगर) यांनी शैक्षणिक दृष्टीकोनातून पाच गावांतील विद्यार्थ्यांना पेपर पॅडचे वाटप केले.

“शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग सुकर होतो,” या विचारातून जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा सुधाकरनगर, नाईकनगर, पेढी, सातघरी व बोंढारा या गावांतील सर्व विद्यार्थ्यांना पेपर पॅड देण्यात आले. आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लेखन सराव सुलभ व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे जाधव यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद समाधान देणारा ठरला. ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या उपक्रमाचे पाचही गावांतील जि.प. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच शालेय व्यवस्थापन समित्यांकडून निकेश जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या