नागपूर शहरात गॅस सिलेंडरचा भीषण तुटवडा; विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त”

लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ मार्च 

 

अर्चना तालावर 

नागपूर :- बुट्टीबोरी प्रतिनिधी 

 

संपूर्ण नागपूर शहर व परिसरात सध्या गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस वितरणात होत असलेल्या अनियमिततेमुळे अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी पर्याय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

शहरातील विविध भागांमध्ये गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. विशेषतः भाड्याने राहणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक तसेच नोकरी करणारे नागरिक यांना या तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे.

विद्यार्थ्यांनी सांगितले की, “गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे रोजच्या जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हॉटेलचा आधार घ्यावा लागत असून त्याचा आर्थिक भारही वाढत आहे.”

दरम्यान, काही ठिकाणी काळाबाजाराच्या तक्रारीही समोर येत असून अधिक दराने सिलेंडर विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गॅस वितरण यंत्रणेमध्ये बिघाड, पुरवठ्यातील अडथळे किंवा अन्य कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत, सुरळीत आणि नियमित गॅस पुरवठा सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्या

त येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या