थेंबात माया, सेवेतून आधार” — मेघा महिला मंडळाची विशेष मुलांसाठी जीवनदायी भेट

लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ मार्च
नागपूर :-
सामाजिक बांधिलकी जपत नागपूर येथील मेघा महिला मंडळ, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या वतीने कल्पतरु विशेष शाळेला वॉटर फिल्टर आणि वॉटर कूलरची उपयुक्त भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विशेष मुलांच्या दैनंदिन गरजांमध्ये मोठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्षा सौ. डॉ. उन्नती पांडे दातार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सौ. निशा पांडे, सौ. माधुरी चौधरी आणि सौ. मानसी घरोटे यांनीही सहभाग नोंदवून उपक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विशेष मुलांशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवला. तसेच त्यांच्या उपयोगासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मेघा महिला मंडळाचा हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता, विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सावजी,सचिव डॉ.आर. एम.उत्तरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान या कार्यक्रमाला शाळेचे संपूर्ण कर्मचारी वृंद उपस्थित होते.त्यांनी मंडळाचे मनःपूर्वक आभार मानत भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
