फटाक्यांनी भरलेल्या गाडीला अचानक आग; कासोळा-पुसद मार्गावर थरारक घटना, व्हिडिओ व्हायरल

लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ एप्रिल

महागाव :-

कासोळा गावाहून पुसदकडे येत असताना फटाक्यांनी भरलेल्या एका गाडीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके भरलेले होते. प्रवासादरम्यान अचानक आग लागल्याने काही क्षणांतच परिस्थिती गंभीर बनली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या संदर्भात पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी दिली आहे. पुढील तपासाबाबत पोलिसांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या