उमरखेडच्या भूमिपुत्र डॉक्टरांकडून आरोग्यवर्धक उपक्रम – डॉ. अंकुश देवसरकर यांचा ‘गुळ पावडर’ उद्योग सुरु !
⬛ उत्पादित गुळ पावडरची देशासह विदेशात मागणी
⚫ ज्ञानेश्वर ठाकरे
“आरोग्यसेवा आणि उद्योजकता दोन्ही समाजहितासाठी असाव्यात या विचाराची साकार प्रतिमा म्हणजे डॉ. अंकुश देवसरकर. पेशाने डॉक्टर असलेले आणि समाजसेवेची ओढ मनात बाळगणारे हे उमरखेडचे (विदर्भ)भूमिपुत्र आता ‘गुळ पावडर निर्मिती उद्योगा’च्या माध्यमातून आरोग्यदायी क्रांतीचा नवा अध्याय लिहीत आहेत.उमरखेड तालुक्याच्या मातीत जन्मलेले नांदेड येथील भगवती हॉस्पिटलचे यशस्वी संचालक म्हणून ओळखले जातात.
डॉ. अंकुश विठ्ठलराव देवसरकर यांनी वैद्यकीय सेवेसोबतच हिंगोली लोकसभा मतदार संघातील ऊसउत्पादक शेतकरी आणि नवतरुण बेरोजगारांसाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील
तोंडापूर (मराठवाडा ) वारंगा जवळील माता भवानी जागरी गुळ पावडर उद्योग – वारंगा ॲग्रो इंडस्ट्रीज’ या नावाने अत्याधुनिक गुळ पावडर उत्पादन केंद्र उभारले आहे.
डॉ. देवसरकर यांनी उमरखेड परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त गुळ पावडर निर्मिती (प्रोसेसिंग) युनिट उभारले आहे. पारंपरिक गुळ उत्पादनाला आधुनिक स्पर्श देत, नैसर्गिक गोडवा आणि पोषणमूल्य जपणाऱ्या या उत्पादनामुळे ग्राहकांना साखरेचा आरोग्यदायी पर्याय मिळणार आहे.हा उपक्रम स्थानिक शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी स्थिर बाजारपेठ मिळवून देईल, तर युवकांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
“ग्रामीण भागात उद्योग उभारणे म्हणजे फक्त व्यवसाय नव्हे, तर समाजाला सक्षम बनवण्याचे काम. आरोग्य, शाश्वत शेती आणि स्थानिक विकास या तिन्ही क्षेत्रांना जोडणारा हा माझा प्रयत्न आहे,असे डॉ. अंकुश देवसरकर यांनी लोकवेधशी बोलताना सांगितले.
बॉस:
गुळ पावडर उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी मेक इन रुल इंडिया या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले आहे. सेंद्रिय शेतीला चालना, स्थानिक उत्पादकांना आर्थिक बळकटी आणि ग्राहकांना नैसर्गिक पर्याय हे तिन्ही फायदे एकत्र देणारा हा प्रकल्प सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून अन्य साखर आणि गुळ कारखान्याच्या तुलनात्मक उसाला भाव देत आहे.डॉ. देवसरकर यांची हा पुढाकार तरुण पिढीसाठी गरुडझेप प्रेरणादायी उदाहरण ठरत असून,आरोग्यदायी भारत या स्वप्नाला ग्रामीण पातळीवर नवी गती देणारी ठरत आहे.

