शेतकरी पुत्र झाला एम. बी. बी. एस. , एम. डी. मेडिसिन .

 

लोकवेध न्यूज नेटवर्क

ज्ञानेश्वर ठाकरे :

उमरखेड नगरीचे भूमिपुत्र डॉ. विठ्ठलराव चौधरी यांचे नातु , डॉ. गजानन अशोकराव चौधरी यांनी पदव्युत्तर एम. डी. जनरल मेडिसिन ( MD General Medicine ) वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून पदव्युत्तर परीक्षेमध्ये प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत .

त्यांनी त्यांचे पदव्युत्तरवैद्यकीय शिक्षण एम. डी. जनरल मेडिसिन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिलचर , आसाम येथे पूर्ण केले तसेच एम. बी. बी. एस. – इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे पूर्ण केले.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण – गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे पूर्ण झाले आणि शालेय शिक्षण पहिली ते दहावी – गुरुदेव गोरोबा विद्या मंदिर उमरखेड येथे पूर्ण झाले . आपण एका सामान्य शेतकरी कुटुंबातुन आलोत , या उमरखेड नगरीत घडलोत आणि आपलं काही देणं आपल्या गावासाठी लागतं ही निस्वार्थ भावना त्यांची आहे .

 

आपले कठोर परिश्रम आणि प्रबळ ईच्छाशक्ती च्या जोरावर हे यश संपादन केले आहे , आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर जी उंची गाठली त्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये घेतलेल्या भरारीसाठी आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा सर्व सतरातून त्यांना मिळत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या