घांटजी (जि. यवतमाळ) येथील जिव्हाळ्याची भिंत संस्थेला भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचा मायेचा हात एका महिन्याच्या किराणा साहित्याचे जिव्हाळ्याने वितरण

⚫   लोकवेध न्यूज नेटवर्क

घांटजी ( जि. यवतमाळ) : सेवेला धर्म मानणाऱ्या आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यास तत्पर असलेल्या भारत सरकार मान्यता प्राप्त भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) यांच्यातर्फे यवतमाळ जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच सामाजिक संवेदनशीलतेच्या धाग्यातून जिव्हाळ्याची भिंत, घांटजी जि. यवतमाळ या सेवाभावी संस्थेला एका महिन्याचा संपूर्ण किराणा साहित्य संच प्रदान करून समाजात मायेची, जिव्हाळ्याची आणि मानवतेची जाणीव पुन्हा अधोरेखित करण्यात आली.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घांटजी येथे भेट देत जिव्हाळ्याची भिंत संस्थेचे दैनंदिन कार्य, सेवा उपक्रम आणि गरजा जाणून घेतल्या. संस्थेमध्ये राहणाऱ्या वृद्ध, निराधार व गरजू व्यक्तींशी संवाद साधून त्यांची मानसिक व वस्तुस्थितीतील आवश्यकता समजून घेतल्यानंतर नांदेड येथील दानशूर व्यक्तिमत्व संजयजी भंडारी यांच्या सहकार्याने या साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे संस्थेच्या दैनंदिन खर्चाचा मोठा ताण हलका झाला असून, सेवाभाव वृद्धिंगत करणारी ही मदत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

या वेळी भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) चे अमरावती विभागीय अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक घरझोडे, संदीप मुनोत, बंडूभाऊ तोडसाम, अरविंद जाधव, सुनील मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिव्हाळ्याची भिंत संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून सेवा क्षेत्रात केलेल्या कार्याचे मनापासून कौतुक केले. तसेच, अशी संस्था समाजाच्या मनाला खऱ्या अर्थाने शांतता आणि समाधान देते, असे उद्गारही त्यांनी व्यक्त केले.

सहयोग स्वीकारताना जिव्हाळ्याची भिंत, घांटजी चे संचालक सूरज हेमके यांनी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “मानवी संवेदनांवर आधारित अशा मदतीमुळे संस्थेच्या कार्याला मोठा आधार मिळतो. आम्ही फक्त सेवाभाव ठेवतो; मात्र अशा महासंघांच्या सहकार्यामुळे आमच्या सेवेला बळकटी मिळते. समाजातील दातृत्व हीच आमची खरी संपत्ती आहे.”

घांटजी परिसरात या जिव्हाळ्याच्या उपक्रमाची मोठी चर्चा असून, महासंघाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गरजूंसाठी प्रेमाने, हसतमुखाने केलेली ही मदत मानवतेचा खरा उत्सव असल्याचे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. समाजात सकारात्मकता पसरविणाऱ्या अशा उपक्रमांमुळे यवतमाळ जिल्हा सेवाभावी उपक्रमांचा आदर्श केंद्र ठरत आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या