वृद्धापकाळाने उपा. चंद्रभागाबाई वंजारे यांचे निधन
लोकवेध न्यूज नेटवर्क / १७ एप्रिल
उमरखेड :-
अंबोडा येथील रहिवासी उपा. चंद्रभागाबाई दिगांबर वंजारे (वय ९३) यांचे गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:५५ वाजता वृद्धापकाळाने व्यंकटेश नगर, पुसद रोड, उमरखेड येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्या साध्या, प्रेमळ व कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिचित होत्या.
त्यांचा पार्थिदेहावर शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता हिंदू स्मशानभूमी, महागाव रोड, उमरखेड येथे अंत्यसंकार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तीन मुले — रामदास वंजारे, भारत वंजारे, प्रा. प्रभाकर वंजारे, तसेच एक मुलगी रमाबाई कनिंदे (यवतमाळ), सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
