संकटात पुन्हा धावून आले नितीनभाऊ भूतडा सहस्रकुंड येथे अडकलेल्या ७ पर्यटकांचा यशस्वी बचाव

 

लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ सहस्रकुंड धबधबा येथे आज भीषण परिस्थिती निर्माण झाली. पर्यटनासाठी आलेले सात पर्यटक अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकले, आणि क्षणभरात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या संकटाच्या क्षणी भाजप नेते नितीनभाऊ भूतडा यांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदार नेतृत्वामुळे मोठी दुर्घटना टळली.मुरली धरणातून पाण्याचा विसर्ग अचानक वाढल्याने नदीपात्रात प्रचंड प्रवाह आला. काही पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकले. यातील दोन जणांनी प्रयत्न करून बाहेर पडले, परंतु उर्वरित पाच जण जीव मुठीत धरून पाण्याच्या मध्यभागी अडकून पडले होते.पर्यटक अडकल्याचे दृश्य पाहून पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज यांनी प्रसंगावधान राखत नितीनभाऊ भूतडा यांना तातडीने संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांना बचकऱ्यात सुखरूप काढण्यासाठी वेळ मिळाला.

 

⬛ नितीनभाऊंची जबाबदारीची झेप

 

घटनेची माहिती मिळताच नितीनभाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता तहसीलदार उमरखेड यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी नांदेड येथून प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापन पथक (रेस्क्यू टीम) तातडीने सहस्रकुंडकडे रवाना केले.त्यांच्या थेट समन्वयामुळे घटनास्थळी महसूल अधिकारी, पोलीस, स्थानिक मच्छीमार, व रेस्क्यू टीम काही मिनिटांत पोहोचले आणि बचावकार्य सुरु केले.

 

धैर्य, कौशल्य आणि समन्वय यांचे उदाहरण

 

उच्च जलप्रवाहातसुद्धा संयुक्त बचाव पथकाने अत्यंत धैर्याने कार्य केले. दोरखंड, बोटी आणि स्थानिकांच्या मदतीने सर्व पाच अडकलेले पर्यटक सुखरूप बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत तहसीलदार उमरखेड, महसूल कर्मचारी, स्थानिक युवक आणि रेस्क्यू टीमचे योगदान विशेष ठरले.

 

नितीन भाऊंच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक

 

या संपूर्ण घटनेत नितीनभाऊ भूतडा यांनी दाखवलेली संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि समन्वयाची ताकद यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. संकटसमयी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.उमरखेड, किनवट आणि नांदेड परिसरात सर्वत्र संकटात धावून येणारे नितीनभाऊ अशी चर्चा सुरू आहे. नागरिक, अधिकारी आणि सोशल मीडियावरून त्यांच्या कार्यतत्परतेचे भरभरून कौतुक होत आहे.

 

घटनेनंतर प्रतिक्रिया देताना नितीनभाऊ म्हणाले,

जनतेच्या सुरक्षेपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. संकटात लोकांच्या जीवावर आलेले धोके टाळणे हीच खरी सेवा आहे. सर्व अधिकारी, स्थानिक तरुण आणि रेस्क्यू टीमने अतिशय कौशल्याने काम केले यांच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या