फुलसावंगी बाजारपेठ बनली रेती उपसा करणारा अड्डा.. थेट जेसीबी मशीन ने रात्रंदिवस वाळू उपसा सुरू !

वाळू माफियांच्या तस्करीला महसूल विभागाची मुक संमती ?
लोकवेध न्युज नेटवर्क
⚫ ज्ञानेश्वर ठाकरे :
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेले फुलसावंगी गाव रेती उपसा करणारे अड्ड्याचे स्थान म्हणून नावारुपास आलेले आहे.येथील रेतीची महागाव, पुसद, उमरखेड आदी शहरात प्रचंड मागणी असते. त्यामुळे या परिसरात अवैध रेती उत्खनन तेजीत सुरु असून दिवसाढवळ्या या,मार्गावरून सर्रास टिप्पर मधून वाहतूक करतांना दिसून येत आहे.या संदर्भात शासनाला पुरावा पाहिजे असल्यास महागाव शहरात काही ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास किती ? आणि केव्हा, टिप्पर द्वारे वाहतूक झाली याची माहिती उघड होईल..नुकतीच पावसाने उसनंती घेतली आहे.सततच्या पावसाने या वर्षी दीघडी उच्च पातळी बंधाऱ्या जवळ मोठ्याप्रमाणात रेती जमा झाली आहे.बंधाऱ्याचे गेट बंद होताच वाळू माफियांनी जास्तीच जास्त वाळू उतखनाना साठी
सोमवारी दिनांक १० नोव्हेंबर च्या रात्री थेट जे सी बी मशीन ने वाळू उपसा केल्याचे वृत्त फुलसावंगीत सकाळी वाऱ्या सारखे पसरले. यामुळे वाळू माफियाची जेसीबी मशीन पैनगंगा नदी पत्रात उतरवण्या इतकी मजल होते म्हणजे याला महसूल विभागाची मूक संमती म्हणावे लागेल का ? असा सवाल उपस्थित होत आहे.खरच उमरखेड विभागीय महसूल विभाग या वाळू तस्करी पुढे हतबल झाला आहे का असावा का आहे अनेक प्रश्न नागरिक उवस्थित करत आहेत.
नुकताच पावसाळा संपला; पावसाळा संपताच येथील दीघडी उच्च पातळी बंधाऱ्याचे दार बंद करण्यात आले.या वर्षी मागील काही वर्षाच्या तुलनेत जास्त वाळू साठा बंधाऱ्या च्या दारा जवळ जमा झालेला आहे.या आयत्या व कोणतेही महसूल न भरता वाळू वर डल्ला मारण्यासाठी येथील वाळू माफिया सरसावले आहेत.
रेती चोरी करणाऱ्या रेती माफियानी महसूल विभागाच्या हालचाली वर पाळत ठेवण्यासाठी ठेवलेले प्रत्येकाचे ५ ते ६पंटर असा फोज फाटा येथील नदी पात्रात दररोज हा गोतावळा जमा होऊन वाळू चोरी करत आहेत. त्यामुळे या रेती माफियांना राजकीय आश्रय मिळत असल्याचे बोलल्या जात असून यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यात नाकारता येत नाही.कारण सध्याचा निवडणुकीचा काळ पाहता या संदर्भात महसूल आणि पोलिस प्रशासनाने अलर्ट रहाणे गरजेचे आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र आल्याने एखाद्या यात्रेत ट्रॅक्टर च्या स्पर्धा असावी व ती पाहण्यासाठी लोकांनी जणू गर्दी करावी किंबहुना या पेक्षा ही जास्तच गर्दी येथील नदी पात्रात जमा होत आहे.वाळू चोरी काही नवीन नाही पण इतक्या मोठ्या व बिंदास पद्धतीने वाळूचा उपसा होतांना कधी पाहण्यात आलेला नाही.यातच भरात भर म्हणजे व वाळू चोरीला एका नवीन उंची वर नेणारी घटना फुलसावंगी च्या पैनगंगा नदी पात्रात सोमवार च्या रात्री घडल्याची चर्चा आता रंगत असून यांनी पंधरा तारखे पर्यंत रेती उपसा करून वाहतूक करण्याचा त्यांनी अवैध्य परवाना मिळवल्याचे कळते.या कथित घटनेने महसूल विभागाच्या उपाय योजना किती तोकड्या पडत आहेत हेच अधोरेखित झाले आणून निवडणुकीचा काळ पाहता यांचे चांगलेच फावले आहे.होत असलेला बिंदास रेती उपसा जणू महसूल विभागाने वाळू माफिया साठी रान मोकळं करून दिला असावा असे चीत्र निर्माण झालेआहे. येथे टिप्पर शिवाय तब्बल ६० ट्रॅक्टर दररोज रात्रंदिवस पैनगंगा दिगडी उच्च पातळी बंधाऱ्याजवळून रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. गावाच्या चारीही बाजूंच्या निर्जन स्थळी, हिंगणी पाणंद रस्त्यावर रेतीची साठवणूक केली जात आहे. महागाव, पुसद, उमरखेडच्या माफियांशी संपर्क साधून त्यांना रेती विकून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाहतूक केली जात आहे. या व्यवसायात पूर्वाश्रमीचे गुन्हेगार, राजकीय पक्षांचे तालुकास्तरीय पदाधिकारीही उतरले. चोरीची रेती महागाव, पुसद, उमरखेडच्या रेती माफियांना विकली जाते.फुलसावंगी एकंदरीत जिल्ह्याचा वाळू चोरीचा मागील अनेक वर्षांपासून केंद्र बिंदू ठरत आहे.
महसूल अधिकारी निवडणूक कार्यक्रमात व्यस्त…
अवैध्य रेती चोरी संदर्भात महागाव महसूल विभागाने मोठ्याप्रमाणात अंकुश लावला होता.परंतु उमरखेड नगरपरिषद आणि ढाणकी नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमात महसूल अधिकारी व्यस्त असल्याचे पाहून रेती तस्करी वाढली आहे. या संदर्भात महागाव तहसीलदार अभय मस्के यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
