सहकार सप्ताह तसेच महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती,महागावच्या मुख्य यार्ड परिसरात मंगळवार, दि. ३० जून रोजी मंगळवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात बाजार समितीचे सभापती रवी रा. पवार, उपसभापती रामेश्वर पां. करपे, सहकार अधिकारी (श्रेणी-1) एस. एस. पिंपरखेडे यांच्यासह समितीचे संचालक कृष्णराव रा. राऊत, किशोर रं. देशमुख, उकंडा सि. राठोड, वासुदेव उ.नेवारे,गजेंद्र बा. देशमुख,विनोद बा.भगत तसेच समितीचे सचिव अभिजित गुगळेसह कर्मचारी वृंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.सहकार सप्ताह आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांनी वृक्षारोपणासोबतच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षलागवडीत सहभागी व्हावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.