महागाव तालुक्यात शिक्षक वर्ग गुंतला ठेकेदारी आणि एल आय सी बिझनेसमध्ये शिक्षणाची वाट चुकले मास्तर ,आता विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या भरोशावर ? ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव उघड पडले आहे. ज्ञानदानाची पवित्र जबाबदारी सांभाळणारा शिक्षक वर्गच आता ठेकेदारी, कमिशनखोरी आणि एल आय सी बिझनेस यामध्ये गुंतला असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा फज्जा उडाल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शिक्षकांच्या खांद्यावर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आहे, तेच शिक्षक आता साईड बिझनेसचे एजंट म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. वर्गाच्या वेळेत येथील एक शिक्षक आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या एलआयसी पॉलिसी विक्री करत आहे.त्यांनी महागाव तालुक्यात मोठे प्रस्थ निर्माण केले असून ते अनेकदा वादग्रस्त सुद्धा ठरले आहेत. वास्तव धक्कादायक आरोप ठोस ! काही शिक्षकांकडे एल आय सीचे टार्गेट पूर्ण करणे हेच प्राथमिक ध्येय, विद्यार्थ्यांचे शिक्षण दुय्यम ठेकेदारीमुळे शाळेमध्ये उपस्थिती कमी, गावोगावी व्यवहार, मोजमाप, बिलं हीच दिनचर्या पालकांकडून पॉलिसी घेण्याचा अप्रत्यक्ष दबाव, न घेतल्यास मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी शाळेच्या वेळेतच बिझनेस कॉल, बिझनेस मीटिंग अध्यापनावर झापड वर्गात जुनी वही, जुने लेक्चर, विद्यार्थ्यांना नो गाईडन्स शाळांमध्ये परीक्षेचा दर्जा, निकाल, प्रगती संपूर्ण घसरण होतांना सातत्याने दिसून येते. ———————————————————————- प्रशासन फक्त आदेश काढते अंमलबजावणी मात्र शून्य ! शिक्षकांना व्यवसायावर निर्बंध असावेत, साईड बिझनेस बंद असावा, शाळेच्या वेळेत दुसरे काम करू नये असे आदेश शिक्षण विभागाकडून अनेकदा निघाले. परंतु महागाव तालुक्यात त्यांची अंमलबजावणी झालीच नाही.माणूसबळ कमी, शाळांमध्ये तुटवडा आणि जे आहेत तेच कमाईच्या मागे पळताना दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारमय होत चालले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवायचे असेल तर शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने ह्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.नाहीतर आज ठेकेदारीच्या आणि एलआयसीच्या जाळ्यात अडकलेले शिक्षक उद्या संपूर्ण पिढीचे शैक्षणिक भविष्य अंधारात लोटतील असा पालक वर्गातून आरोप होत आहे. ________________________________________________ शिक्षकांचे व्यवसाय पाहणार कोण? शिक्षणाचा बळी का ? स्थानिक नागरिक, पालक वर्ग संतप्त कठोर कारवाईच एकमेव पर्याय ! दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची मागणी,स्वतंत्र पथकाने चौकशी करून अहवाल जाहीर करावा, कोणते शिक्षक कोणत्या बिझनेसमध्ये गुंतले आहेत ते पारदर्शकपणे उघड करावे, शाळांमध्ये अचानक ऑडिट व निरीक्षण मोहीम सुरू करावी विद्यार्थ्यांचे नुकसान झालेल्या शाळांत विशेष अध्यापन मोहीम राबवावी अशी जनभावना आहे.

लोकवेध न्यूज नेटवर्क 

ज्ञानेश्वर ठाकरे:

 

महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव उघड पडले आहे. ज्ञानदानाची पवित्र जबाबदारी सांभाळणारा शिक्षक वर्गच आता ठेकेदारी, कमिशनखोरी आणि एल आय सी बिझनेस यामध्ये गुंतला असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा फज्जा उडाल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

ज्या शिक्षकांच्या खांद्यावर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आहे, तेच शिक्षक आता साईड बिझनेसचे एजंट म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. वर्गाच्या वेळेत येथील एक शिक्षक आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या एलआयसी पॉलिसी विक्री करत आहे.त्यांनी महागाव तालुक्यात मोठे प्रस्थ निर्माण केले असून ते अनेकदा वादग्रस्त सुद्धा ठरले आहेत.

 

 

वास्तव धक्कादायक आरोप ठोस !

 

काही शिक्षकांकडे एल आय सीचे टार्गेट पूर्ण करणे हेच प्राथमिक ध्येय, विद्यार्थ्यांचे शिक्षण दुय्यम

ठेकेदारीमुळे शाळेमध्ये उपस्थिती कमी, गावोगावी व्यवहार, मोजमाप, बिलं हीच दिनचर्या

पालकांकडून पॉलिसी घेण्याचा अप्रत्यक्ष दबाव, न घेतल्यास मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी

शाळेच्या वेळेतच बिझनेस कॉल, बिझनेस मीटिंग

अध्यापनावर झापड वर्गात जुनी वही, जुने लेक्चर, विद्यार्थ्यांना नो गाईडन्स शाळांमध्ये परीक्षेचा दर्जा, निकाल, प्रगती संपूर्ण घसरण होतांना सातत्याने दिसून येते.

———————————————————————-

प्रशासन फक्त आदेश काढते अंमलबजावणी मात्र शून्य !

 

शिक्षकांना व्यवसायावर निर्बंध असावेत, साईड बिझनेस बंद असावा, शाळेच्या वेळेत दुसरे काम करू नये असे आदेश शिक्षण विभागाकडून अनेकदा निघाले. परंतु महागाव तालुक्यात त्यांची अंमलबजावणी झालीच नाही.माणूसबळ कमी, शाळांमध्ये तुटवडा आणि जे आहेत तेच कमाईच्या मागे पळताना दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारमय होत चालले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवायचे असेल तर शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने ह्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.नाहीतर आज ठेकेदारीच्या आणि एलआयसीच्या जाळ्यात अडकलेले शिक्षक उद्या संपूर्ण पिढीचे शैक्षणिक भविष्य अंधारात लोटतील असा पालक वर्गातून आरोप होत आहे.

________________________________________________

शिक्षकांचे व्यवसाय पाहणार कोण? शिक्षणाचा बळी का ?

स्थानिक नागरिक, पालक वर्ग संतप्त कठोर कारवाईच एकमेव पर्याय !

 

दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची मागणी,स्वतंत्र पथकाने चौकशी करून अहवाल जाहीर करावा,

कोणते शिक्षक कोणत्या बिझनेसमध्ये गुंतले आहेत ते पारदर्शकपणे उघड करावे, शाळांमध्ये अचानक ऑडिट व निरीक्षण मोहीम सुरू करावी विद्यार्थ्यांचे नुकसान झालेल्या शाळांत विशेष अध्यापन मोहीम राबवावी अशी जनभावना आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या