कोवळ्या वृक्षांना कोणी लावला वणवा… त्या..बेजबदार अधिकाऱ्यावर कार्यवाही ,का ? नाही.. गुन्हा नोंद ,कार्यवाही मात्र शून्य

लोकवेध न्यूज नेटवर्क / २९ एप्रिल
महागाव :-
काळी दौलत खान वनपरिक्षेत्रातील आगीच्या घटनेनंतर जबाबदारीचा प्रश्न अधिकच चिघळला आहे. पिंपळगाव–सारकिनी परिसरातील सुमारे दोन ते अडीच हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाल्यानंतर स्पॉट पंचनामा करणे वरिष्ठांना अनिवार्य होते. या घटनेत केवळ पाला पाचोळा च जळाला असल्याचा तसा अहवाल देऊन सदर प्रकरण प्रकरण दडपले जाण्याची यात शक्यता वर्तवली जात असताना.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यात संबंधितांना पोलिसात गुन्हा नोंदवणयाची सूचनादेण्यातआली.दरम्यान यात अज्ञात व्यक्तीवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले..
मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांकडून माहितीनुसार ,आगीत मोठ्या प्रमाणावर झाडांचे नुकसान झाले आहे.मात्र, अधिकृत स्तरावर केवळ पालापाचोळा जळाला असा अहवाल दिल्याने वास्तव आणि कागदोपत्री नोंदीत विसंगती असल्याचा दिसून येत आहे.
या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आगीचे नेमके कारण काय ? नैसर्गिक कारण,मानवी निष्काळजीपणा की इतर काही ? याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी आता तपासाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सहायक उपवनसंरक्षक शशांक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार,या प्रकरणात पंचनामा करण्यात आला असून वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास गुंज बीट चे ,सतत मुख्यालयी राहत नसलेले वनपाल करत आहेत.
दरम्यान,वृक्ष लागवडीनंतर संगोपन व संरक्षणाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असताना, या घटनेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे पर्यावरणीय हानीसोबतच शासनाच्या निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांकडून या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.कारणे दाखवा नोटीस देऊन,दोष सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची ठोस कारवाई तसेच घटनेत वृक्षांचे झालेले नुकसान व या पासून भविष्यात होणारे उत्पन्नाचे मूल्यांकन करून याची संबंधितांकडून वसुली करावी,अशी जनभावना आहे.
