उटीच्या प्रिन्स गावंडेची नवोदय विद्यालयात दमदार निवड; जिल्ह्यातून गुणवत्तेचा ठसा

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०८ मे.
पुसद :-
भारत सरकारच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा (घाटंजी) येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत महागाव तालुक्यातील उटी येथील प्रिन्स प्रशांत गावंडे यांची उल्लेखनीय निवड झाली आहे.
उटी येथील प्रशांत गावंडे यांचे सुपुत्र तथा जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी प्रिन्स गावंडे याने उत्कृष्ट गुण संपादन करत नवोदय विद्यालयातील प्रवेश निश्चित केला. जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यापैकी केवळ ८० विद्यार्थ्यांची निवड होत असल्याने ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक मानली जाते. अशा परिस्थितीत प्रिन्सने मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
प्रिन्सच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई प्राप्ती प्रशांत गावंडे, वडील प्रशांत गावंडे, ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक कौस्तुभ धुमाळे तसेच शिक्षिका अश्विनी वाडीकर मॅडम यांना दिले.भविष्यात विविध स्पर्धा परीक्षा देऊन मोठे यश संपादन करण्याचा निर्धारही प्रिन्स गावंडे यांनी व्यक्त केला.
