ब्राह्मणगावचा ‘तेजमल गांधी’ पुन्हा अव्वल! बारावीमध्ये ९८.९५% निकालाने यशाचा नवा उच्चांक

कु. श्रावणी संदीप पाटील
लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :-
ब्राह्मणगाव (ता. उमरखेड) येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्था, पुसद संचालित तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने बारावी (HSC) परीक्षेत पुन्हा एकदा दणदणीत यश संपादन करत आपल्या उज्ज्वल परंपरेला नवा आयाम दिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच महाविद्यालयाच्या यशाची जोरदार नोंद झाली.
यंदा विज्ञान शाखेचा तब्बल ९८.९५ टक्के निकाल लागून महाविद्यालयाने गुणवत्तेचा उच्चांक गाठला आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा लौकिक अधिक भक्कम केला आहे.
गुणवत्ता यादीत अर्णव महेश पानपट्टे यांनी ८९.३३% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. श्रावणी संदीप पाटील (८८.३३%) यांनी द्वितीय, तर कु. जानवी विलास पसलवाड (८७.६६%) यांनी तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. याशिवाय विज्ञान शाखेत ३९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी तर १११ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
या भव्य यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर व सचिव अश्विनी पाटील चोंढीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव पंजाबराव माने व मार्गदर्शिका सौ.अर्चनाताई माने यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत विश्वास व्यक्त केला.प्राचार्य विष्णू नागोराव सादुडे,पर्यवेक्षक हरी राजाराम खोकले,समन्वयक भुवनेश्वर गावंडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे ब्राह्मणगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
