हिवरा (संगम) येथे ‘राजस्व समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३७६ नागरिकांना तात्काळ

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०७ मार्च

महागाव : –

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेले राजस्व समाधान शिबिर महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आले असून एकूण १३७६ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला.शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अभय मस्के होते. नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी महसूल व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी थेट मार्गदर्शन करत अनेक कामे जागेवरच मार्गी लावली. त्यामुळे गावकऱ्यांनी शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दरम्यान महागाव सेतू सुविधा केंद्राचे संचालक नारायणराव शिरबिरे व हिवरा येथील असीम अबानी यांनी उपस्थित लाभार्थ्यांना आवश्यकता असलेलेली कागदपत्रे उपलब्ध करून दिलेत.यांमुळे सेतू सुविधा केंद्र हे नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचं प्रामुख्याने दिसून आलेत.

या शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ व ८अ उताऱ्यांतील त्रुटी दुरुस्ती, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, डिजिटल उतारे उपलब्ध करून देणे अशा सेवा देण्यात आल्या. तसेच उत्पन्न, रहिवासी, जात व क्रीमीलेअर प्रमाणपत्रे देण्याबरोबरच,पी एम किसान समाधान निधि अँग्रीस्टेक यांसह विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार गजानन पराते, पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, तालुका आरोग्य अधिकारी निमिष धुळधुळे, उपअधीक्षक भूमिअभिलेख कलावती आडे, मंडळ अधिकारी मारोती एकूलवार, गोविंद ठाकरे, सचिन फटाले, शिवकांत माने तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक दवने उपस्थित होते.

तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे, शरद कदम, राजू धोतरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, लाभार्थी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शिबिरातून आपली प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत  हे, शिबिर आमच्यासाठी देवदूत ठरले अशी भावना व्यक्त केली आणि शासनाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या