महागावात भाजप शहर मंडळाची संवाद बैठक उत्साहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती; बूथ व शक्ती केंद्र बळकटीवर भर

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव:-
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार महागाव शहर मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व सक्रिय कार्यकर्त्यांची संवाद बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संवाद बैठकीस माजी तालुकाप्रमुख दीपक आडे, माजी तालुकाप्रमुख विलास शेंबे, शहर मंडळ अध्यक्ष निलेश नरवाडे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश पाटील नरवाडे, माजी तालुका सरचिटणीस संजय पाटे,भाजप गटनेते गजानन साबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम खंदारे,जगदीश नरवाडे पाटील व के. डी. नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच शहर मंडळ सरचिटणीस रघुनाथ नरवाडे, विशाल डाहळे,भाजप महिला तालुका अध्यक्ष मायाभाई राजनकर, नगरसेविका रंजना ताई आडे नरवाडे, छाया खंदारे, पुष्पा कावळे, निर्मलाबाई सोयाम, मुकिंदा आबोरे, श्रीकांत राऊत, गजानन मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत आगामी संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.शक्ती केंद्र व बूथ पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.या संवाद बैठकीमुळे महागाव शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटन वाढीसाठी सर्वांनी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
