स्वतःसाठी नाही,समाजासाठी जगणारा माणूस” निंगणूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पोयामजी करेवाड मैदानात

⚫लोकवेध न्यूज
उमरखेड :-
बंदी भागातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि गरजूंच्या मदतीसाठी कायम पुढे असणारे कुरुळी (ता. उमरखेड) येथील रहिवासी पोयामजी करेवाड यांनी निंगणूर जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक नागरिकांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पोयामजी करेवाड हे आरोग्य, शिक्षण आणि निराधार लोकांच्या मदतीसाठी ओळखले जातात.अनेक गरजू नागरिकांची शासकीय कामे अडकली असतील,तर ती मार्गी लावण्यासाठी ते स्वतःच्या खर्चाने धाव घेतात. आजपर्यंत त्यांनी अनेकांना यवतमाळ येथील शासकीय कार्यालयांमध्ये नेऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले आहे. आई वडिलांच्या निधनानंतर ते,घरात एकटे असूनही त्यांनी लग्न न करता समाजकार्यालाच प्राधान्य दिले.माझे जीवन मी जनतेसाठीच अर्पण केले आहे.असे ते ठामपणे सांगतात.या संदर्भात लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेध न्यूज शी बोलताना त्यांनी सांगितले की,मी कधीही पक्षाकडे उमेदवारीसाठी आग्रह धरलेला नाही.मात्र माझ्या कामावर विश्वास ठेवून यावेळी मला भारतीय जनता पक्ष कडून उमेदवारी मिळेल,अशी मला आशा आहे.
निंगणूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोयामजी करेवाड यांना उमेदवारी मिळावी,यासाठी कुरुळी व बंदी भागातील नागरिक एकवटले आहेत.निस्वार्थ सेवा,साधी राहणी आणि सामान्य माणसाशी असलेली नाळ यामुळे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा मजबूत होताना दिसत आहे.
