शब्द नव्हे तर काम; वार्ड ११ मध्ये संभाजी नरवाडेंनी सोडवला पाण्याचा प्रश्न
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव:-
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील पिण्याच्या पाण्याचा दीर्घकाळ असलेला प्रलंबि प्रश्न अखेर कायमस्वरूपी सुटला असून ज्येष्ठ नेते, महागाव नगरपंचायत चे स्वीकृत नगरसेवक संभाजी नरवाडे यांच्या पुढाकारातून बोअरवेलचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.या बोअरवेलला मुबलक प्रमाणात पाणी लागले असून त्यावर आज इलेक्ट्रिक मोटार पंप बसविण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेषतः महिलांना दैनंदिन पाण्यासाठी करावी लागणारी कसरत आता संपली आहे. अनेक दिवसांपासून नागरिक पाणीटंचाईला सामोरे जात होते. मात्र, या बोअरवेलमुळे आता पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणताही वैयक्तिक स्वार्थ न पाहता, केवळ लोकहिताचा विचार करून संभाजी नरवाडे यांनी हा प्रश्न प्रत्यक्ष कृतीतून सोडविला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि जनतेप्रती असलेल्या जबाबदारीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. प्रभागातील महिलांसह नागरिकांनी एकमुखाने त्यांचे आभार मानले आहेत.
लोकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करणारे नेतृत्व म्हणून संभाजी नरवाडे यांची ओळख अधिक ठळक होत असून, स्थानिक राजकारणात त्यांच्या कार्याची सकारात्मक चर्चा सुरू आहे.

