अमृत पॅटर्नचे जनक शिवश्री अमृतराव देशमुख यांना मराठा कृषी भूषण पुरस्कार जाहीर

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :-

मराठा सेवा संघ यांच्या वतीने सिंदखेड राजा येथे आयोजित राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब यांच्या ४२८ व्या जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन १२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.या पावन सोहळ्यानिमित्त कापूस व इतर पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या ‘अमृत पॅटर्न’चे जनक शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख यांना यावर्षीचा मराठा कृषी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण कृषी पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे अमृत पॅटर्न राज्यातच नव्हे तर देशपातळीवर चर्चेत आला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघाने हा सन्मान जाहीर केल्याने महागाव तालुका व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.यापुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,केंद्रीय मंत्री व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून लाखो जिजाऊ व शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

जिजाऊ जन्मोत्सव व पुरस्कार सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी शिवश्री दिगंबरराव जगताप (राज्य उपाध्यक्ष), सुरेशराव कदम (विभागीय अध्यक्ष), वसंतराव देशमुख (केंद्रीय कार्यकारिणी सदस्य), पी. डी. शिंदे (जिल्हाध्यक्ष – जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद), श्रीकांत देशमुख (जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. संदीप शिंदे (जिल्हा सचिव), अमोल जगताप (जिल्हा सहसचिव), उदयभाऊ नरवाडे (तालुकाध्यक्ष), पंकज देशमुख (तालुका सचिव), सतीश ठाकरे (तालुका कोषाध्यक्ष), प्रसिद्धीप्रमुख गजानन वाघमारे, नानाभाऊ ठाकरे, दत्तराव कदम, सुनील भरवाडे, दिनेश देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी अमृतराव देशमुख यांची भेट घेऊन मराठा सेवा संघाची दिनदर्शिका, निमंत्रण पत्रिका व पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.अमृतराव देशमुख यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असून शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या