किल्ले वाफगाव येथे होणाऱ्या २२७ व्या राज्याभिषेक महोत्सव समितीत सविताताई चंद्रेंची राज्य महिला प्रतिनिधी म्हणून निवड

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क  

उमरखेड :—

 

महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या २२७ व्या राज्याभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या प्रमुख समितीत राज्य महिला प्रतिनिधी म्हणून ढाणकी (जि. यवतमाळ) येथील महिला पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सविताताई चंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. हा भव्य राज्याभिषेक सोहळा किल्ले वाफगाव, जिल्हा पुणे येथे संपन्न होणार आहे.सविताताई चंद्रे यांची निवड झाल्याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रमुख राज्याभिषेक सोहळा समितीचे प्रमुख श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले असून, या निवडीमुळे उमरखेडसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

ढाणकी येथील सविताताई चंद्रे या २०१६ पासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्या नारिशक्ती बहुउद्देशीय संस्थाच्या अध्यक्षा तसेच नारिशक्ती न्यूज चॅनलच्या संपादक आहेत. याशिवाय, धनगर समाज युवा मल्हार सेनाच्या युवती प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी सकल धनगर समाजातील मेंढपाळांच्या विविध समस्या हिवाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडल्या आहेत.सामाजिक कार्यात नेहमीच अग्रणी भूमिका बजावणाऱ्या सविताताई चंद्रे यांची राज्याभिषेक महोत्सवात राज्य महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याने अखिल भारतीय धनगर समाजासह विविध सामाजिक, पत्रकार संघटनांकडून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या