दिवट पिंपरीतून जिल्हा बँकेवर प्रवीण सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड :- 

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी भाजपप्रणित विविध कार्यकारी सहकारी संस्था, दिवट पिंपरी येथून प्रवीण सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली. दिवट पिंपरी येथील सर्व सोसायटी सदस्यांनी कोणताही विरोध न करता सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

निवडीनंतर प्रवीण सूर्यवंशी यांचाभाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार किसनराव वानखेडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सहकार क्षेत्रातील अनुभव व कार्यक्षमतेच्या जोरावर सूर्यवंशी यांची निवड झाल्याने दिवट पिंपरी व परिसरातील सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या