काही तासांत राजीनामा निश्चित; सभापती गुलाबराव जाधव जिल्हा उपनिबंधकांकडे रवाना

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाबराव लोभा जाधव हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाले असून, पुढील काही तासांत राजीनामा सादर होणार आहे.
सभापतींविरोधात दाखल अविश्वास ठराव २६ डिसेंबर रोजी होणार असून तो पारित होण्याची दाट शक्यता असल्याने, त्याआधीच राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार गुलाबराव जाधव हे स्वतः जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.
“मी स्वतः राजीनामा देण्यासाठी जात आहे,” असे जाधव यांनी लोकवेध न्यूजशी थेट बोलताना स्पष्ट केले.
अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामा सादर झाल्यास सभापतीपद रिक्त होणार असून, बाजार समितीतील पुढील सत्ताकारणाची दिशा आजच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घडामोडीकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
