सहकार क्षेत्रात गोदावरी अर्बनचा मानाचा झेंडा — ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्काराने’ राष्ट्रीय पातळीवर गौरव

ज्ञानेश्वर ठाकरे:
⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
पुणे :-
जागतिक सहकार वर्ष २०२५ निमित्त ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित सहकार संमेलनात गोदावरी अर्बन नागरी सहकारी पतसंस्था ला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर तसेच कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी गोदावरी अर्बनचे सचिव अॅड. रविंद्र रगटे, उपसरव्यवस्थापक रवी इंगळे, विजय शिरमेवार, वरिष्ठ मार्केटिंग अधिकारी महेश केंद्रे तसेच पुणे शाखेचे व्यवस्थापक अंकुश बिबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी गोदावरी अर्बनच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत, संस्थेने सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढले. पारदर्शकता, आधुनिक व्यवस्थापन प्रणाली, सभासदाभिमुख सेवा आणि सातत्यपूर्ण प्रगती या बाबींमुळे गोदावरी अर्बनने सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक नामदार हेमंत पाटील तसेच अध्यक्ष राजश्री पाटील यांनी गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद व ठेवीदार यांचे अभिनंदन केले. संघभावना, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचे हे यशस्वी फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
