महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सवासाठी भगवान पंडागळे यांची यवतमाळ जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव : – 

 

महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या आयोजनासाठी भगवानराव पंडागळे यांची यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती किल्ले वाफगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे होणाऱ्या राज्याभिषेक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.

राज्याभिषेक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हानिहाय प्रतिनिधींची निवड केली जात असून, त्याच अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी भगवानराव पंडागळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे अधिकृत पत्र महोत्सव समितीचे प्रमुख भूषणसिंहराजे होळकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.

या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात महाराजा होळकर यांच्या कार्याचा इतिहास, विचारधारा आणि राज्याभिषेक महोत्सवाची माहिती पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी भगवानराव पंडागळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, समितीने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या स्मृती जपण्याच्या या उपक्रमात प्रामाणिक योगदान देणार असल्याचे भगवानराव पंडागळे यांनी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या