अविश्वास ठरावापूर्वी राजीनाम्याची शक्यता; सभापती गुलाबराव जाधव यांच्या हालचालींना वेग

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव : –
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाबराव लोभा जाधव हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या हालचाली वाढवत असल्याची विश्वासनीय सूत्राकडून माहिती मिळत आहे. त्यांनी आपले पद वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत परंतु, २६ डिसेंबर रोजी सभापतींविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव पारित होण्याची दाट शक्यता असल्याने, अविश्वास ठरावामुळे पदावरून बेअब्रू होण्यापेक्षा आधी राजीनामा देण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असल्याची जोरदार चर्चा आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अविश्वास ठराव मंजूर झाल्यास थेट पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापतींकडून आता नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय व प्रशासकीय पातळीवर संपर्क वाढवण्यात येत असून, संभाव्य राजीनाम्याबाबत अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी आणि अविश्वास ठरावाच्या निर्णयाकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले असून, सभापतींच्या राजीनाम्याबाबत पुढील काही दिवसांत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या