काळी दौलत खानमध्ये विकासाचा महामेरू; इरफान सैय्यद यांना आगामी निवडणुकीत भक्कम जनाधाराची चिन्हे

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव

काळी दौलत खान ग्रामपंचायतीत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य इरफान सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वांगीण विकासकामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलत असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान नेतृत्वाला भक्कम जनाधार मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते विकास, नाली बांधकाम, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, स्वातंत्र्यकाळापासून विकासापासून वंचित असलेल्या पेवठाण परिसरात पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था, संत सेवालाल महाराज परिसराचे सौंदर्यीकरण, सामाकी माता सभागृहाची दुरुस्ती, खाणीकर्म विभागामार्फत रोहिदास सभागृहाची उभारणी, तसेच अण्णाभाऊ साठे सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय पंधरा लाख रुपये खर्चून बिरसा मुंडा सभागृह उभारण्यात आले असून, गुरुदेव सेवा मंडळ परिसरात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पेवठाण येथे तब्बल ४८ कुटुंबांना घरकुलाचा लाभ देत मालकी हक्क बहाल करण्यात आला आहे.
मुस्लिम बहुल असलेल्या या ग्रामपंचायतीत आदिवासी, बंजारा, मराठा समाजाचे संतुलित समीकरण असून, गावातील एकोपा जपण्यात स्थानिक पुढारी सक्रिय आहेत. ग्रामपंचायत सदस्य तथा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस इरफान सैय्यद व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार समन्वयाने सुरू असल्याचे चित्र दिसून येते.
सरपंच निशा संतोष राठोड या प्रभावी महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असून, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ग्रामपंचायत कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहतात. शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख संतोष राठोड व इरफान सैय्यद यांच्यातील समन्वयातूनच विकासकामांना गती मिळाल्याचे बोलले जाते. परिवर्तन पॅनलचे उंकडराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी काम करीत आहेत. पुसद येथील नाईक बंगल्याशी असलेले हितसंबंधही ग्रामपंचायतीस विकासात्मकदृष्ट्या लाभदायक ठरत आहेत.
येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या १८ जानेवारीला संपत असून, सध्या परिवर्तन पॅनलचे सात सदस्य ग्रामपंचायतीत आहेत. या पार्श्वभूमीवर विकासकामांचा थेट लाभ नागरिकांना मिळाल्याने इरफान सैय्यद यांच्याविषयी सकारात्मक वातावरण असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना भक्कम जनाधार मिळेल, असा सूर स्थानिक राजकारणात उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या