यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधीपदी डॉ. अंकुश देवसरकर यांची निवड

 

 

⚫लोकवेध न्युज नेटवर्क

 

महागाव: – 

 

नांदेड येथील भगवती हॉस्पिटलचे संचालक तसेच वारंगा ॲग्रो इंडस्ट्रीज शुगर फॅक्टरीचे मालक डॉ. अंकुश रावजी देवसरकर यांची विविध कार्यकारी सहकारी संस्था, देवसरी यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. देवसरकर हे आरोग्य, उद्योग व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी परिचित आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे सहकार क्षेत्रात अनुभवी व दूरदृष्टी असलेले नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी,सभास द व ग्रामीण विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे.

या, नियुक्तीबद्दल भाजपाचे समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,गजानन सुरोशे यांनी डॉ अंकुश देवसरकर यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.राजकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी, सभासद तसेच विविध स्तरांतून डॉ. देवसरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या