१०४ वर्षांच्या आयुष्याला शांत विराम ; श्रीक्षेत्र माहूर गडचे ज्येष्ठ धारकरी नारायण बुध भारती यांचे निधन

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव  : –


महाराष्ट्र राज्य अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तसेच आनंद आश्रम, केरोळी फाटा श्रीक्षेत्र माहूर गडचे मठाधीश योगी शाम भारती महाराज उर्फ धनेश्वर भारती यांचे वडील स्व. नारायण बुध भारती (वय १०४) यांचे दिनांक १० डिसेंबर २०२5 रोजी बुधवार सकाळी ८:३० वाजता मुळगाव अनंतवाडी (ता. महागाव) येथील राहत्या घरी निधन झाले.

स्व. भारती यांच्यामागे पत्नी चंद्रभागाबाई, योगी शाम भारती महाराजांसह डिगांबर भारती, राजकमल भारती, राजेंद्र भारती, कैलास भारती, विनायक भारती असे सहा मुलगे, सुनबाई, नातू-पनतू असा मोठा परिवार आहे.भारती परिवाराचा श्रीक्षेत्र माहूर गडच्या अध्यात्मिक वारश्याशी तसेच राजकीय-सामाजिक क्षेत्राशी दीर्घकाळाचा संबंध असल्याने त्यांच्या निधनाने महागाव व माहूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या