केन कॅरिअर बॅरेजमध्ये अपघात ,कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू !

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
वसंतनगर सहकारी साखर कारखाना, पोफाळी येथे ऊस गाळप हंगाम सुरू असताना भीषण अपघातात कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ११ डिसेंबर रोजी घडली.महात्मा फुले वॉर्ड, उमरखेड येथील शेख इरफान शेख उमदू (वय ३०) हा कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना केन कॅरिअर बॅरेजवर पाय घसरला आणि रॉड शरीरात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.अत्यवस्थ अवस्थेतही त्याला वाचवता आले नाही.
मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड येथे करण्यात आले. अपघाताची माहिती नातेवाईकाने पोफाळी पोलिसात दिल्यानंतर ठाणेदार निलेश शेंबडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला असल्याचे सांगितले.कारखान्यातील सुरक्षा उपायांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे करणारी ही घटना असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
——————————————————————————-
⬛ कामगाराच्या मृत्यूचे आम्हाला दुःख आहे.
सदर कामगाराचा काम करताना पाय घसरला असल्याने तो थेट मशीन वर कोसळला,दरम्यान कारखाना प्रशासनाने तत्काळ मशनिरी बंद करून सदर कामगाराला बाहेर काढले.परंतु कामगाराच्या छातीत मोठी जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला. कारखाना प्रशासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना या घटने संदर्भात अर्थसाह्य देता येईल.
दिनेश परमार,मॅनेजर पोफाळी ,वसंत स.साखर कारखाना.
